About

About Blessing Foundation

Blessing Foundation is a committed social organization focused on helping those in need and fostering community development.

Volunteers
0 +
Donations
0 +
Events
0 +
Lives Impacted
0 +

About Blessing Foundation


ब्लेसिंग फाउंडेशन ही एक सामाजिक बांधिलकी जपणारी संस्था असून समाजातील विविध घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे.
आमच्या फाउंडेशनचा मुख्य उद्देश समाजसेवा, जनजागृती, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, युवक मार्गदर्शन आणि गरजूंना मदत हा आहे.
समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आम्ही विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि जनहिताचे उपक्रम सातत्याने राबवत असतो.
गरजू, वंचित आणि दुर्बल घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे.
आमचे ध्येय
समाजातील प्रत्येक घटकाला समान संधी, योग्य मार्गदर्शन आणि आवश्यक आधार मिळावा यासाठी कार्य करणे.
मानवतेच्या भावनेतून समाजात एकता, प्रगती आणि सशक्तीकरण घडवून आणणे.
आमचे उद्दिष्ट
गरजू नागरिकांना मदत व सहकार्य
आरोग्यविषयक शिबिरे व जनजागृती कार्यक्रम
महिलांसाठी सक्षमीकरण उपक्रम
विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत व मार्गदर्शन
युवकांसाठी करिअर, कौशल्य आणि उद्योजकता मार्गदर्शन
अन्नदान व सामाजिक सहाय्य उपक्रम
सांस्कृतिक व समाजप्रबोधन कार्यक्रमांचे आयोजन
समाजातील विविध प्रश्नांवर जनजागृती निर्माण करणे
आमचे कार्यक्षेत्र

ब्लेसिंग फाउंडेशन समाजहितासाठी विविध उपक्रम राबवते, जसे की:
१. आरोग्य सेवा
मोफत आरोग्य तपासणी शिबिरे
रक्तदान शिबिरे
आरोग्य जनजागृती मोहीम
२. शिक्षण
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
करिअर मार्गदर्शन सत्रे
स्पर्धा परीक्षा व कौशल्य विकास मार्गदर्शन
३. महिला सक्षमीकरण
महिलांसाठी स्वावलंबन प्रशिक्षण
मार्गदर्शन व प्रेरणादायी कार्यक्रम
स्वयंरोजगाराबाबत जनजागृती
४. अन्नदान व समाजसेवा
गरजूंना अन्नदान
आपत्ती काळात मदतकार्य
गरीब व वंचित कुटुंबांना सहाय्य
५. समाजप्रबोधन व सांस्कृतिक उपक्रम
समाजप्रबोधनपर नाटके, व्याख्याने व कार्यक्रम
युवकांसाठी प्रेरणादायी उपक्रम
सामाजिक एकात्मतेसाठी विशेष मोहिमा
आमची बांधिलकी
ब्लेसिंग फाउंडेशन ही केवळ संस्था नसून समाजासाठी काम करणारी एक चळवळ आहे.
आम्ही सेवा, संवेदना आणि समर्पण या मूल्यांवर विश्वास ठेवतो.
समाजाच्या उन्नतीसाठी प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचून सकारात्मक परिवर्तन घडवणे, हीच आमची खरी ओळख आहे.

Vision:

A society where everyone has access to health, opportunities, guidance, and support for a dignified life.

Mission:

To deliver compassionate and sustainable programs in healthcare, empowerment, education, and social welfare.

Become a volunteer

Join us for a better life and beautiful future